Talegaon news: अखेर मायमर मेडिकल कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल
Pckhabar- बिलाअभावी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह तीन दिवस ‘कोल्ड स्टोरेज’मध्ये ठेवणाऱ्या तळेगांव दाभाडे येथील मायमर मेडिकल कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश शंकर लोके (वय-50) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा सुधीर गणेश लोके (वय-23, रा. मळवली, मावळ) याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मायमर काॅलेज प्रशासनावर कलम 297 अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिली माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वडिलांना कोरोनाचे निदान झाल्याने तळेगाव दाभाडे येथील
मायमर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान गणेश लोके यांचा 1 मे रोजी मृत्यू झाला. फिर्यादी यांनी बिल न भरल्याने मायमर मेडिकल कॉलेज प्रशासनाने गणेश लोके यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता तीन दिवस
‘कोल्ड स्टोरेज’ मध्ये ठेवला. तथापि, मृतदेहाची अप्रतिष्ठा केल्यामुळे मायमर काॅलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, याप्रकरणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा विषय मांडला होता. उपमुख्यमंत्री पवार यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.










Leave a Reply