Talegaon news: तळेगावात कोरोनाचे 522 ॲक्टिव्ह रुग्ण, कडकडीत लाॅकडाऊनला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
Pckhabar- तळेगाव दाभाडे शहरात कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढत आहे. शहरातील विविध भागात सध्यस्थितीत कोरोनाचे 522 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपासून दि. 12 मे पर्यंत लागू करण्यात आलेल्या कडकडीत लाॅकडाऊनला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने केले आहे.
तळेगाव दाभाडे शहरात आतापर्यंत 5 हजार 49 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील 4 हजार 443 नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. शहरातील 84 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तळेगाव शहर कोरोनाचे ‘व्हाॅटस्पाॅट’ होत आहे. नागरिक बेफिकीरपणाने वागत आहेत. किराणा साहित्य, भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यामुळेच शहरात कडकडीत लाॅकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषद प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र, रुग्ण संख्येनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. पोलिसांच्या वतीने लिंब फाटा, जिजामाता चौक, तळेगाव स्टेशन या ठिकाणी नागरिकांची तपासणी केली जात आहे.










Leave a Reply