Pimpri news: जेव्हा पोलीस आयुक्त वेशांतर करून पोलीस ठाण्यात धडकतात…!
Pckhabar- धडाकेबाज कामगिरीमुळे
सातत्याने चर्चेत राहणारे पोलीस अधिकारी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करून आपल्याच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली.

आयुक्त कृष्ण प्रकाश बुधवारी रात्री वेशांतर करून मिया जमालखान कमालखान पठाण बनले…तर मियाची बिवी म्हणून सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी सुध्दा वेशांतर करत शहर दौऱ्यावर निघाल्या…
मेकअप आर्टिस्ट ने प्रकाश यांना मिया सारखी दाढी चिटकवली…डोक्यावर लालसर रंगाचा केसांचा विग चढवला…,आणि प्रकाश यांचा पुरता लूकच बदलून टाकला… सलवार, कुर्ता आणि तोंडावर मास्क… अशा वेशात कृष्ण प्रकाश मोहिमेवर निघाले.
खासगी टॅक्सी करून ही मियाबिवीची जोडी रात्री १२ च्या सुमारास पिंपरी पोलिस स्टेशनला धडकली…
आमच्या शेजाऱ्याला कोविडसाठी रुग्णवाहिका पाहिजे होती म्हणून फोन केला तर तब्बल ८००० रुपये सांगितले, अशी तक्रार घेऊन ते सांगू लागले …रुग्णवाहिकावाला आम्हाला अक्षरशः लूटतोय, तुम्हा तक्रार दाखल करून घ्या, असा आग्राह या जोडीने धरला. मात्र सामान्य माणसाला यायचा तोच अनुभव दस्तुरखुद्द पोलिस आयुक्तांनाही आला. हे आमचे काम नाही, म्हणून त्यावेळी हजर पोलिसाने थेट दोघांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला … तेव्हा कृष्ण प्रकाश यांनी मास्क काढून त्याला ओळख दिली त्यावेळी त्या पोलीस अधिकाऱ्याची अक्षरशः भंबेरी उडाली.
दुसरा छापा रात्री १.३० वाजता हिंजवडी पोलिस स्टेशन नंतर तर २ वाजता वाकड पोलीस स्टेशन आणि मग गस्त पॉईंटवर घालत या जोडगोळीने अक्षरशः पोलीस दलाची झोप उडवली. हिंजवडी आणि वाकड पोलीस स्टेशन मध्ये गेल्या नंतर प्रेरणा कट्टे म्हणाल्या, आम्ही आमच्या रमजानचे उपवास ठेवतो…, परिसरात काही लोक रोज फटाके वाजवतात, त्याचा त्रास होतो… काही लोकांना बोललो तर त्यांनी माझ्या बायकोची छेड काढली, मला कंबरेत लाथा घातल्या. झटापटही झाली. अशी गंभीर तक्रार हिंजवडी पोलिसांना दिली.
त्यावेळी ड्युटीवर हजर पोलिसाने खूप गाँभिर्याने सर्व प्रकऱणाची माहिती घेतली आणि कच्ची फिर्याद तयार केली…आपण वरिष्ठांना बोलावतो, ते इतक्यात येतील तोपर्यंत थांबण्याची विनंतीही केली… हा सगळा ड्रामा झाल्यावर पोलिसा आयुक्तांनी आपली ओळख दाखविल्यावर तो कावराबावरा झाला होता…असे कट्टे म्हणाल्या. तर वाकडमध्येही खूप चांगला अनुभव आल्याच कृष्ण प्रकाश म्हणाले.
आपला स्टाफ खरोखर कसे काम करतो, तक्रार दारांना कशी वागणूक देतो याची तपासणी करण्यासाठी आपण यापुढेही अशाच प्रकारे अचानाक धाडी टाकणार आहोत. कुठे दारू, मटका अड्डे असो वा कुठलाही काळा धंदा ज्याला समाजाला त्रास होतो तो बंद झालाच पाहिजे.

शहरात शून्य टक्का काळे धंदे हे आपले टार्गेट आहे. त्यासाठी आता आपण स्वतः न सांगता कुठेही अचानक छापे टाकणार आहोत. त्याला जबाबदार असणाऱ्या पोलिस अधिककाऱ्यावर कठोर कारवाईसुध्दा कऱणार आहोत… शहर भयमुक्त करायचे आहे… पोलिसांबद्दल जनतेच्या मनात चांगली प्रतिमा निर्माण कऱणे… पोलिस लोकाभिमुख व्हावा आणि शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी आपण अधिक आक्रमक पावले उचलणार असल्याचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केले.










Leave a Reply