Talegaon news: श्री संत तुकाराम सहकारी कारखान्यात 6 लाख 33 हजार 200 पोती साखर उत्पादन
Pckhabar- श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 23 वा गळीत हंगाम संपला आहे. 6 लाख 33 हजार 200 पोती साखर उत्पादन झाले. यावर्षी 175 दिवस गाळप हंगाम सुरू राहिला.
या कालावधीमध्ये 5 लाख 61 हजार 300 मेट्रिक टन उच्चांकी ऊसाचे गाळप करण्यात आला आहे. मावळ , मुळशी, खेड, हवेली आणि शिरूर तालुक्यातील 461 गावे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतात. यावर्षीच्या गाळपाचे नियोजन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले ,उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, यांच्यासह विद्यमान संचालक मंडळाने केले होते. तर कार्यकारी संचालक साहेबराव पठारे व सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोना संक्रमण कालखंड असताना देखील उच्चांकी उत्पादन पार पाडले .
ऊस गाळपाबरोबर कारखाना सहवीज निर्मिती प्रकल्प चालवित सुरू आहे. यावर्षी 5 कोटी 50 लाख 12 हजार700 युनिट वीज निर्मिती झाली. 3 कोटी 79लाख 95 हजार युनिट वीज कारखान्याने महावितरण वीज कंपनीला विकली आहे.










Leave a Reply