Moshi News: मोशीतील शिबिरात ४७२ जणांचे रक्तदान

Moshi News: मोशीतील शिबिरात ४७२ जणांचे रक्तदान
Pckhabar-मोशी ग्रामस्थ व ग्रामदैवत श्री.नागेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट आयोजित महारक्तदान शिबिरात ४७२ जणांनी रक्तदान केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ब्लड बँक,यशवंतराव चव्हाण रुग्णालय ब्लड बँक, संजीवन ब्लड बँक या रक्तपेढयांनी रक्तसंकलन केले. देवस्थानने केलेल्या आवाहनाला मोशीकरांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

सर्वपक्षीय नेते,आजी – माजी नगरसेवक,नगरसेविका,विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी यांनी राजकीय मतभेद विसरून रक्तदान शिबिरात हजेरी लावली. पुरुषांबरोबरच महिलांनी देखील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येक रक्तदात्यास कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांचे सुरक्षा किट देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *