Mamata Banerjee Loses : बंगालमध्ये ‘गड आला पण सिंह गेला’ ; ममतांचा नंदीग्राममध्ये धक्कादायक पराभव
भाजपचे शुभेन्दु अधिकारी यांनी ममता दिदींचा केला 1953 मतांनी पराभव
Pckhabar- देशाचे लक्ष लागून असलेल्या नंदीग्राममध्ये तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि भाजपचे शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत झाली. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत बॅनर्जी यांचा 1953 मतांनी पराभव झाला आहे. राज्यात निर्विवादपणे एकहाती सत्ता मिळवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राममधील पराभवानंतर ‘गड आला पण सिंह गेला’ अशी स्थिती झाली आहे.
ममता बॅनर्जी यांनी म्हटले होतं की, नंदीग्रामबद्दल काळजी करू नका, मी नंदीग्रामसाठी संघर्ष केला आहे. कारण माझ्यासाठी ही निवडणूक एक आंदोलन होती. नंदीग्राममधील लोकांनी जो कौल दिला तो मी स्वीकारते. आम्ही 221 हून अधिक जागा जिंकल्या आणि भाजप निवडणूक हरला आहे, असं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे.
ममता यांच्या पराभवानंतर तृणमूलचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी देखील ट्वीट केलं आहे. काही मोठ्या लढाया जिंकण्यासाठी बलिदान तर द्यावंच लागतं, असे त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने आतापर्यंत 213 जागांवर आघाडी घेतली आहे.







Leave a Reply