Pandharpur News : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत  राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’

Pandharpur News : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत  राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’
Pckhabar- महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत  मतदारांनी राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे  3716 मतांनी विजयी झाले असून राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. पंढरपूरमध्ये झालेला पराभव हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात पोटनिवडणूक पार पडली. ही पोटनिवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक केली होती.

7 व्या फेरीपासूनच समाधान आवताडे यांनी जोरदार मुसंडी मारली आणि मोठी आघाडी मिळवली. अखेरच्या फेरीअखेर समाधान आवताडे यांना विजयी घोषित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *