Pune news: सकल मराठा वैद्यकीय समितीतर्फे रविवारी कर्वेनगरमध्ये रक्तदान शिबिर
Pckhabar- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताची मोठी कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर रक्ताची गरज ओळखून सकल मराठा वैद्यकीय समितीतर्फे रविवारी कर्वेनगरमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबिर वारजे माळवाडी रोडवरील हिंगणे होम कॉलनी सभागृहात येत्या रविवारी सकाळी 10 दुपारी 4 या वेळेत होणार आहे.
रक्तदान शिबिरादरम्यान सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे.
देशभरात येत्या काही दिवसानंतर 18 वर्षांच्या पुढील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण होणार आहे. लसीकरण झाल्यानंतर पुढचे 60 दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. रक्ताचा हा तुटवडा टाळण्यासाठी लसीकरणापूर्वी रक्तदान करण्याची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन सकल मराठा वैद्यकीय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.










Leave a Reply