Pimpri news: कोविड केअर सेंटर्ससाठी तात्काळ शासनाचा विशेष अधिकारी नेमावा !

Pimpri news: कोविड केअर सेंटर्ससाठी तात्काळ शासनाचा विशेष अधिकारी नेमावा !

– काँग्रेस नेते पृथ्वीराज साठे यांची मुख्यमंत्र्यां कडे मागणी
Pckhabar- पिंपरी चिंचवड शहरातील कोविड आजाराच्या बाबतीतील उपाययोजनांमध्ये होत असलेल्या गैरसोयी व हेळसांड पाहता शासनाने त्वरित पूर्णवेळ विशेष अधिकारी नेमून त्यांद्वारे च सर्व कोविड केअर सेंटर्स ची दैनंदिन पाहणी व योग्य नियोजन करावे अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे इमेल च्या माध्यमातून निवेदना द्वारे नुकतीच केली आहे.

निवेदनात साठे यांनी नमूद केले आहे की, या अडचणीच्या काळात नागरिकांना ना गैरसोय,अडचणी व मनस्ताप होतो आहे आणि आणि त्या बाबतीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची उपलब्ध यंत्रणा अपुरी व कमकुवत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून उभारण्यात आलेल्या व खाजगी संस्थेकडून संचलित असलेल्या नेहरूनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटर मध्ये अनेक अपू-या सुविधांमुळे नागरिकांच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.
याबाबत तात्काळ विशेष अधिकारी नेमावा व सर्व प्रथम नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात व गैरसोयीनां जबाबदार असणाऱ्या वर कारवाई करावी अशी मागणी साठे यांनी केली आहे.

सदर निवेदनाची प्रत राज्याचे आरोग्यमंत्री, पालकमंत्री पुणे जिल्हा, विभागीय आयुक्त पुणे विभाग, जिल्हाधिकारी पुणे व आयुक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांना ही ईमेल द्वारे पाठविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *