Talegaon News: जनसेवा विकास समितीतर्फे 5 रूपयात ‘जनसेवा थाळी’ उपक्रम सुरू
Pckhabar- लाॅकडाऊनमध्ये गोर-गरीब नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी
जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवभोजन थाळीच्या धर्तीवर 5 रुपयात ‘जनसेवा थाळी’ या उपक्रमाचे आज (रविवार) उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे, प्रवक्ते मिलिंद अच्युत, अनिल पवार, किशोर कारके, नगरसेवक निखिल भगत, संतोष शिंदे, संतोष दाभाडे, समीर खांडगे, सुनील कारंडे, चिराग खांडगे, विकास पवार, सतीश ढेंबे, अनिल कारके, मुन्ना जाधव, सुनील जैन, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
तळेगाव दाभाडे येथील मराठा क्रांती चौकात ‘जनसेवा थाळी’ सुरू करण्यात आली आहे. हा उपक्रम 1 मे पर्यंत राबविण्यात येणार आहे.
दररोज दुपारी 12:30 ते 2:30 वा. यावेळेत ही थाळी सुरु असणार आहे.
पुणे जिल्ह्यासह राज्य भरात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दि. 14 एप्रिल ते 1 मे या कालावधीत कडक तर शनिवार आणि रविवार विकेंड लाॅकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे गोर-गरीब नागरिकांसह रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होऊ नये म्हणून ही जनसेवा थाळी सुरू करण्यात आल्याचे
जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी सांगितले.







Leave a Reply