Talegaon News: तळेगावकरांनो कोरोना वाढतोय, बेफिकीर होऊ नका!

Talegaon News: तळेगावकरांनो कोरोना वाढतोय, बेफिकीर होऊ नका!

Pckhabar- मावळात तळेगाव दाभाडे हद्दीमध्ये कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. २१ ते ४० वयोगटातील कोरोना रुग्णाचे प्रमाण सर्वाधिक असून त्या खालोखाल ४१ ते ६० वयोगटातील रुग्णांची नोंद झाली आहे.  कोरोना रुग्ण वाढीचा वाढता वेग पाहता नागरिकांनी
मास्क, सुरक्षित अंतराचे पालन करावे. गरज असेल तरच घराबाहेर पडून शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी  केले आहे.

तळेगाव दाभाडे शहरात दुस-या टप्यात १ हजार १६४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. महिला – ४४१ तर पुरुष ७२३ आहेत.  २७४ रुग्ण उपचार घेत असून ८८२ रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. तर ८ रुग्ण मृत झाले आहेत.

  वयोगटानुसार रुग्ण संख्या
० ते २० वयोगट – ११९ रुग्ण,
२१ ते ४० वयोगट – ५१५ रुग्ण,
४१ ते ६० वयोगट –३९१ रुग्ण
६० वर्षाच्या पुढील १३९ रुग्णसंख्या आहे.

मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे शहरात सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासन वेळोवेळी कोरोना संदर्भात जनजागृती करत आहे. नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन करत आहेत. त्यानंतरही काही बेफिकीर नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहेत. अशा नागरिकांकडून १ लाख ३४ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *