Pimpri news: आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना दिलासा ; महापालिका देणार तीन हजार रुपये

Pimpri news: आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना दिलासा ; महापालिका देणार तीन हजार रुपये
Pckhabar-  कोविडची साखळी तोडण्यासाठी राज्यशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात आर्थिक दुर्बल घटकातील कुंटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडुन तातडीची मदत म्हणून तीन हजार रुपये देण्यात येणार आहे. शहरातील रिक्षाचालक (बॅचधारक), परवानाधारक फेरीवाले, नोंदणीकृत घरेलु कामगार, चर्मकार (गटई कामगार), नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे चालक, जिम ट्रेनर इ. आर्थिक दुर्बल घटकातील नोंदणीकृत व्यवसाय करणाऱ्यांना मदत दिली जाणार आहे.

कोविड संसर्ग टाळण्यासाठी शासनाने राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन लागु करण्यात आला आहे. यामुळे या आर्थिक दुर्बल घटकातील हातावर पोट असलेल्या लोकांवर आर्थिक संकट ओढवुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
पारंपारिक व्यवसाय करुन उदरनिर्वाह चालविणाऱ्या लोकांचे कोविडमुळे संपुर्ण व्यवसाय उद्वस्त झाले आहेत. अशा अडचणीच्या काळात शहरातील आर्थिकदृष्ट्या खचलेल्या या घटकाला दिलासा देणेसाठी लॉकडाऊन काळात महापालिकेने आर्थिक मदत करावी या संदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी दि. १५ एप्रिल च्या पत्राद्वारे मागणी केली. तसेच, पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनीदेखील याबाबत सुचना दिल्या आहेत. त्यानुसार आज झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीमध्ये राज्यशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन काळात  शहरातील रिक्षाचालक (बॅचधारक), परवानाधारक फेरीवाले, नोंदणीकृत घरेलु कामगार, चर्मकार (गटई कामगार), नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे चालक, जिम ट्रेनर इ. आर्थिक दुर्बल घटकातील नोंदणीकृत व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येवु नये म्हणून तीन हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. राज्यामध्ये अशी स्वतंत्र मदत करणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही पहिलीच महानगरपालिका ठरली असुन मदतीची ही रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितिन लांडगे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *