Chinchwad news: पुणे जिल्ह्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसींचा कोठा वाढवून द्या : आमदार लक्ष्मण जगताप

Chinchwad news: पुणे जिल्ह्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसींचा कोठा वाढवून द्या : आमदार लक्ष्मण जगताप
Pckhabar-पुण्यात जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत दररोज सर्वाधिक वाढ होत आहे. जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील चाचण्यांचे प्रमाण वाढण्याची आवश्यकता बरोबरच मोठ्या प्रमाणावर मनपा मार्फत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्याकरिता कोरोना प्रतिबंधक लसींचा कोठा वाढवून मिळणेबाबत संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे.

याबाबत आमदार जगताप यांनी मंत्री जावडेकर यांना निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की,  उद्योगनगरीत लोकसंख्येच्या प्रमाण लक्षात घेता  शहरातील  कोरोना  संकट पुन्हा तीव्र बनले असून त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात विविध वस्त्या व  गृहनिर्माण संस्थेत  कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याकरिता आवश्यकतेनुसार मुबलक प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीची उपलब्धतता होणे अत्यंत गरजेचे आहे.

  पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना लसीकरणाकरिता प्रवृत्त करणे  गरजेचे आहे. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत लसचा मोठ्या प्रमाणत तुटवडा भासत असल्याने राज्याच्या तुलनेत पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्राकडून पुणे जिल्ह्याकरिता कोरोना प्रतिबंधक लसींचा कोठा वाढवून मिळणेबाबत संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करावा. जेणेकरून पुणे जिल्ह्यातील नागरिकांना तातडीने लस घेणे सोयीचे होईल. तसेच पुणे जिल्ह्यातील रूग्णालयाकरिता केंद्र शासनाकडून व्हेंटीलेटरचा वेळेत पुरवठा करणेबाबत संबंधित यंत्रणेला आपल्या स्तरावरून पाठपुरावा करण्यात यावा, ही विनंतीविनंती आमदार जगताप यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *