Article By Vitthal Dalvi : सुंदर पवित्र प्राचीन संस्कृती आपुली माना…!

Article By Vitthal Dalvi : सुंदर पवित्र प्राचीन संस्कृती आपुली माना…!

Pckhabar-अदृश्य कोरोनामुळे गेला आहे देशाच्या अर्थव्यवस्थेचा व समाजव्यवस्थेचा कणा
आतातरी पूर्वीचीच सुंदर पवित्र प्राचीन संस्कृती आपुली माना…!
तेव्हाच मिळेल पवित्र भारत देशाच्या सुंदर अशा लोकशाहीला कणा…!

भारत देश हा संपूर्ण जगामध्ये विविध परंपरेनं नटलेला सुसंस्कृत अशी भारतीय संस्कृती व पवित्र प्राचीन संस्कृती असलेला थोर संतांच्या विचारांचा व ग्रंथांचा पवित्र असा देश मानला जातो. अशा या देशामध्ये याच थोर संतांचे ग्रंथ, विचारांशिवाय व पवित्र प्राचीन संस्कृतीशिवाय मानव पृथ्वीवर फार काळ सुखाने जगू शकत नाही. सध्याच्या मानवजातीला संतांच्या ग्रंथांशिवाय पर्याय नाही. सध्या पृथ्वीवर सुरु असलेली मानवाची अदृश्य कोरोनारुपी झालेली वाताहत पाहता मानवाला पृथ्वीवर जगणेच कठीण झाले आहे. मानव हताश, निराश होऊन, कोरोनारुपी शिकार होऊन पुन्हा पवित्र प्राचीन संस्कृतीच्या मागे लागून, अभ्यास करुन विविध प्रकारच्या वनस्पतींचे काढे इ. च्या उपचाराने आपले आयुष्य जगत आहे. याच कोरोनारुपी संकटात मार्ग काढत जीवनात आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
सारं काही पाहता सृष्टीवर आलेल्या या महाभयानक संकटात सामना करता करता मानव निराश हताश होऊन जीवन जगत आहे. आता यातून सावरणे कठीण झाले आहे. सध्याचा मानव संतांच्या निरामय आरोग्याच्या विचारांपासून , ग्रंथांपासून दूर चालला आहे. भारतीय पवित्र प्राचीन संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. यातूनच या सर्व गोष्टी पुढे येताना दिसत आहे. अशा अनेक विचारांची जाणीव करुन आमच्या थोर संतांचे ७०० वर्षापूर्वीचे विचार आज मात्र खरे होताना दिसत आहे.
युद्ध कारण पृथ्वीवरती I
विषवायू पसरेल I I
असंख्य जीव ते विषवायूने I
प्राणांसी मुकतील I I
युद्ध कारण पृथ्वीवरती I
प्रदूषण फैलावेल I I
अनेक दशके परिणामे I
मानव त्रासवेल I I

सध्याच्या कोरोनारुपी महामारीत पृथ्वीवर प्रत्येक जीवालाच जगणे कठीण झाले आहे. याच अदृश्य कोरोनारुपी विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. त्यामुळे समाजव्यवस्थेचे झालेले नुकसान, अर्थव्यवस्थेचा उडालेला बोजवारा यामुळे देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा मोडला आहे. यामुळे देशाची सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक व आर्थिक हानी यातून सावरणे अवघड झाले आहे. यातून समाजानं बाहेर कसं पडावं, सुंदर अशा पवित्र प्राचीन संस्कृतीच तसेच पर्यावरणाचं रक्षण कसं करावं. यासारख्या अनेक हितकारक गोष्टींची प्राकर्षाने जाणीव झाल्याच्या दिसून येते.
भारत देश हा संपूर्ण जगामध्ये वसुधैव कुटुंबकम I म्हणजेच विश्व बंधुत्वाचा संदेश देणारा व सर्व जगाच्या मदतीला धावून जाणारा देश म्हणून गणला जातो. अशा या देशामध्ये कोरोनाने केलेला शिरकाव, सृष्टीमध्ये सुरु असलेल्या ब-याच गोष्टींचा अभाव, प्रत्येकजण घालतोय पर्यावरणावर घाव व जंगलामध्ये पशू-पक्षी कशी घेतील धाव, कसा काय मिळेल प्रत्येकाला सुंदर सृष्टीत वाव, सगळीकडेच आहे अभाव, म्हणून कोरोनाने घेतली ही धाव, म्हणून आतातरी या सृष्टीवर कोणी घालू नका घाव. आतातरी पशू-पक्ष्यांना व वन्यजीवांना प्रत्येकानं देऊया वाव आहो तेव्हाच होईल आपुलं सुंदर गाव…

आपल्या भारतीय संस्कृतीत झालेलं परकीय संस्कृतीनं केलेला शिरकाव, मानवात कसा होईल सुसंस्कृत भाव, प्रत्येक गोष्टींमध्ये सुरु आहे भेदभाव, कुणालाच मिळत नाही वाव. सारा वन्य व पशु-पक्ष्यांचाही जीवावर बसतोय नेहमी घाव व मानवाची वाढती हाव, सोशल मिडीयाचा वाढलेला वापर जो तो फोडतोय आपल्याच डोक्यावर खापर, स्विकारलेली औद्योगिक क्रांती कशी थांबणार ? मानवाची गती यामुळे मानवाला कधीच मिळत नाही विश्रांती. मानव सृष्टीमध्ये विसरलाय आपुली सुंदर नाती, म्हणून गेली आहे मानवाची मती, जशा जळतात दिव्याच्या वाती अशीच प्रत्येकानं वाढवूया आपुल्या प्राचीन संस्कृतीरुपी देशाची ख्याती, तेव्हाच या सृष्टीमध्ये प्रत्येकालाच मिळेल गती म्हणून आतातरी प्रत्येकानं विश्वास ठेवावा, संतांच्या ग्रंथांवरती, विचारांवरती, प्राचीन संस्कृतीवरती तेव्हाच सुधारेल मानवाची मती, तेव्हाच होईल खरी प्रगती.

आतातरी मानवाने थोर संतांच्या ग्रंथांचे, विचारांचे अनुकरण करुन पवित्र प्राचीन संस्कृतीचे जतन करुन, संतांप्रमाणे नि:स्वार्थीपणानं वागून, प्रभु रामचंद्रांचे व संतांचे पवित्र विचार डोळ्यासमोर ठेऊन रोज ग्रंथांचे वाचन करुन, प्रभु रामचंद्रांसारख्या धर्माचा व सत्याचा मार्ग अवलंबून व छत्रपती शिवाजी महाराजांसारखं कर्तृत्ववान होऊन, स्वामी विवेकानंदांसारखे तेजस्वी विचारांचे आचरण करुन प्रत्येक मानवानं यातून काहीतरी बोध घेऊन या देशासाठी काहीतरी करुन आतातरी संतांचे ग्रंथ वाचून व आचरुन पर्यावरणातील वन्य जीवांचे रक्षण व संवर्धन करुया. मानवाचे जीवन सृष्टीतील जीवांच्या सेवेसाठी समर्पित करुया.
हिच सदिच्छा ठेऊन स्वप्नांतील नव भारत देश सुजलाम सुफलाम करण्याचा माझा मानस असून आपल्या सर्वांच्याच प्रेरणेने मी हे कार्य सुरु ठेवले आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा हेच माझे प्रेरणा आहेत. आपल्या साधु संतांच्या व ऋषीमुनींच्या ग्रंथांच्या व शिकवणीशिवाय दुसरा पर्याय नाही. आतातरी प्रत्येकानं संतांचेच विचार घ्या वाचून…व विचारांचे अभंग ठेवा रचून …..

कविवर्य विठ्ठल रामू दळवी पंचक्रोशी हायस्कूल दारुंब्रे
गाव कोथुरणे, सोमाटणे,
ता मावळ, जि पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *