Dehu News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांना देहू भाजपतर्फे अभिवादन


Dehu News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांना देहू भाजपतर्फे अभिवादन
Pckhabar-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त तसेच ११ एप्रिल रोजी झालेली क्रांर्तीसुर्य समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले या दोन्ही महापुरुषांची जयंती संयुक्तपणे जिल्हा परीषद शाळा महात्मा फुले विद्या मंदिर माळीनगर येथे भारतीय जनता पार्टी देहू शहराच्या वतीने फुले यांच्या पुतळ्यास तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी बाळासाहेब काळोखे उपाध्यक्ष पुणे जिल्हा भाजप, मुख्याध्यापक श्री नरवडे सर, मच्छिंद्र पांडुरंग परंडवाल शहराध्यक्ष भाजप देहू, सागर मुसूडगे सरचिटणीस भाजप देहू, संदिप परंडवाल अध्यक्ष भाजप देहू ओबीसी सेल, संभाजी बाळसराफ उपाध्यक्ष किसान आघाडी, गणेश परंडवाल, अभय पडोसकर सरचिटणीस विद्यार्थी आघाडी देहू आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *