Pimpri news: पुस्तक वाटपातून बाबासाहेबांना अभिवादन; युवक काँग्रेसचा उपक्रम
Pckhabar- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त पिंपरी चिचंवड शहर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने शहरात विविध ठिकाणी पुस्तके वाटून कार्यरूपी अभिवादन करण्यात आले.
डाॅ. बाबसाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित ‘बाबसाहेब’ हि पाॅकेट पुस्तिका अभिवादकांना पिंपरी चौक, धम्मानंद बुध्दविहार यशवंतनगर, मैत्री बुध्दविहार मोरवाडी, सांगवी, पिंपळे निलख व एच ए जवळील बाबासाहेबांच्या स्मारकाजवळ वाटप करण्यात आल्या. एकूण ५०० पुस्तिकांचे वाटप या आज रोजी करण्यात आले.
उपक्रमा बद्दल माहीती देताना नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले,
“डाॅ. बाबासाहेबांनी देशाला मुख्यत्वे मानवतेवर व सामाजिक समतेवर आधारित संविधान बहाल केले व देशाला नवी कायदेशीर वाटचाल दिली,जीवनमुल्ये दिली व शिका संघटीत व्हा व संघर्ष करा हा संदेश युवा पिढीला दिला.
बाबासाहेबांना वाचनाची विशेष आवड होती ते खुप पुस्तके वाचत व त्यांच्या जीवनात वाचनाला व अभ्यासाला खुपच महत्व होते, आजच्या पिढीने सुध्दा सखाेल पणे वाचावे व युवा पिढीला वाचणाची प्रेरणा व आवड निर्माण व्हावी व त्यातून जीवनाचा उत्कर्ष व्हावा तसेच या पुस्तिका वाटप करून जयंती दिनी बाबासाहेबांच्या आवडीच्या
कार्याला चालना देऊन बाबासाहेबांना अभिवादन करावे”, या उद्देशाने उपक्रम आयोजित केल्याचे बनसोडे यांनी सांगितले.
या प्रसंगी युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एन एस यु आय चे प्रदेश उपाध्यक्ष ॲड उमेश खंदारे ,धम्मानंद प्रतिष्ठाण चे अध्यक्ष अविनाश चौधरी, चिचंवड विधानसभा युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, उत्थान फाउंडेशन चे अध्यक्ष हरप्रित सिंग, संकल्प पुष्पमाला समितीचे समन्वयक रमेश जाधव, तेजस पाटील, जावेद शेख, अतूल अल्हाट, सुरज पांचाळ आदि उपस्थित होते.







Leave a Reply