Pimpri news: कोविड सेंटर फुल्ल; रुग्णांना जमिनीवर झोपवून, खुर्च्यांवर बसवून उपचार

Pimpri news: कोविड सेंटर फुल्ल; रुग्णांना जमिनीवर झोपवून, खुर्च्यांवर बसवून उपचार
Pckhabar- कोरोनाच्या रूग्ण संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात रुग्णांना खाटा मिळत नसल्याने अक्षरश: जमिनीवर झोपवून तसेच खुर्च्यांवर बसवून उपचार केले जात आहेत.रूग्णांना वाचविण्यासाठी डॉक्टराकडून अशा प्रकारे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे सर्वात मोठे असलेल्या वायसीएम रूग्णालयावर दिवसेंदिवस पडणारा ताण पाहता मागील आठवड्यातच हे रूग्णालय कोविड रुग्णांसाठी समर्पित करण्यात आले आहे. सध्या दररोज दोन ते अडीच हजार रूग्ण शहरात नव्याने बाधित होत आहेत. बेड उपलब्ध नसणे या समस्येला आता शहरातील कोविड रूग्णांचे ‘हेड क्वार्टर ‘समजल्या जाणा-या वायसीएमलाही सामोरे जावे लागत असल्याची स्थिती आहे.

आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि वाट्टेल ती यंत्रणा खरेदी करण्याची ताकद पिंपरी महापालिकेची आज आहे. परंतू रूग्ण संख्या दररोज वाढतच असल्याने आरोग्य कर्मचारी, डाॅक्टर व परिचारिका यांना सर्वांची सेवा करताना त्यांच्यावर पडत असलेला ताण व त्यांना येत असलेले नैराश्य यावर मात्र काहीच इलाज नसल्याची स्थिती आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेचे थैमान कमी होण्याऐवजी पिंपरी चिंचवडमध्ये वाढतच चालले असून  वाढत्या रूग्ण संख्येमुळे शहरातील सर्वच कोविड सेंटर व खासगी हाॅस्पिटले रूग्णांनी तुडूंब भरली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *