Pimpri news: वैद्यकीय विभागाच्या प्रवक्तेपदी डॉ. लक्ष्मण गोफणे

Pimpri news: वैद्यकीय विभागाच्या प्रवक्तेपदी डॉ. लक्ष्मण गोफणे
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, दैनंदिन कोरोना तपासणी, लसीकरण, औषधांची उपलब्धता, खाटांची उपलब्धता याची माहिती देण्यासाठी सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांची वैद्यकीय विभागाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. याबाबतचा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकास्तरावर विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. दैनंदिन कोरोना तपासणी, लसीकरण, औषधांची, खाटांची उपलब्धता आणि इतर अनुषंगिक विषयाची माहिती रोजचे-रोज प्रसार माध्यमांद्वारे जनतेला माहिती होण्याच्या दृष्टीने वस्तुस्थितीची माहिती देण्याकरिता सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांची अधिकृत प्रवक्तापदी नियुक्ती केली आहे. डॉ. गोफणे यांनी दरररोज सायंकाळी साडेपाच वाजता प्रसार माध्यमांना कोरोनाची माहिती द्यावी, असे आयुक्तांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *