Pimpri news: कन्या विद्यालयात रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांना अभिवादन
Pckhabar-रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे शाळेत रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापिका शारदा शेटे, पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आहे.
यानंतर ऑनलाईन माध्यमातून इयत्ता आठवी व नववी मधील विद्यार्थिनी कु बर्गे अंजली, कु सुर्वे सावली, कु. नाडे पल्ली सोनी यांनी रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे यांनी रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या जीवनचरित्र व कार्य आपल्या मनोगतातून व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन विद्यालयाच्या पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका स्वाती धामणे यांनी केले. शैला गीते यांनी आभार मानले.







Leave a Reply