Dehu news : आमदार सुनील शेळके यांच्यावर अश्लील टीका; देहू राष्ट्रवादीची पोलीसात तक्रार
Pckhabar- मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांच्याबद्दल पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया उपाध्यक्ष निखिल पडळकर याने फेसबुकवर अश्लील भाषेत टीका केली. पडळकर हा वारंवार समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. याच्यावर त्वरीत गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी देहू राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश हगवणे यांनी केली आहे.
याबाबत देहूरोड पोलीसांना निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी शहराध्यक्ष प्रकाश हगवणे, महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेस कामगार सेलचे उपाध्यक्ष योगेश जाधव, मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस उपाध्यक्ष माणिक जाधव, युवा नेते विशाल काळोखे, प्रसिद्धी प्रमुख विशाल परदेशी, युवक अध्यक्ष योगेश मोरे, मीडिया सेल अध्यक्ष अमित घेनंद , माजी युवक अध्यक्ष योगेश परंडवाल, सरचिटणीस शैलेश चव्हाण, प्रशांत बेंडभर , संदिप गार्डी, सचिन इंगवले, ऋषी चव्हाण, गणेश भोजने, नवनाथ विधाटे, हेमंत सपकाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होेते.
आमदार सुनील शेळके यांच्यावर अश्लील टीका करण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय असून असल्या प्रवृत्तीवर गुन्हा दाखल करून योग्य ते कडक शासन व्हावे. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे देहू शहराध्यक्ष प्रकाश हगवणे यांनी दिला आहे.







Leave a Reply