Maharashtra news: रेरा कायद्यात महत्वाचा बदल: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा
Pckhabar-घर खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आली असून घर खरेदी करताना बिल्डकरांकडून ग्राहकांची फसवणूक होणार नाही. कारण, रेरा (RERA) कायद्यात महत्वाचा बदल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
नागरिकांची अनेक बिल्डर फसवणूक करून त्यांना दाद देत नाहीत. असे अनेक लोक आमच्याकडेही येतात. पण कायद्यात याबाबत काहीच तरतूद नसल्यामुळे त्यावर कारवाई होऊ शकत नव्हती, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच, आता RERA कायद्यात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे एका बिल्डरला एक प्लॅट अनेकांना विकून फसवणूक करता येणार नसल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
याचबरोबर, एखादा प्लॅट विकल्यानंतर आता त्याची संपूर्ण माहिती बिल्डरला RERA कायद्यानुसार ऑनलाईन करणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे एखादा प्लॅट कुणाला विकला गेला आहे, याची माहिती उपलब्ध असणार आहे. कायद्यातील या बदलामुळे ग्राहकांची होणारी फसवणूक टळणार आहे. अशा प्रकरणाची फसणवूक करण्याचा प्रयत्न झाल्यास बिल्डरला कायद्यातील बदलानुसार अटक केली जाऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची होणारी फसवणूक आता टळणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.







Leave a Reply