Pimpri news: शहरातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर !

Pimpri news: आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर !

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या कोरोना रूग्ण संख्येमुळे आरोग्य आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गंभीर, अतिगंभीर रुग्णांना आवश्यक असलेल्या ‘व्हेटिंलेटर’चे एकही बेड शहरात उपलब्ध नाही. त्यामुळे गंभीर रुग्णांना बेड मिळणे अवघड झाले असून कोरोना प्रतिबंधक लस संपल्याने शहरातील लसीकरण आज ठप्प झाले आहे. तर  रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यामुळे इंजेक्शन मिळत नाही. तथापि, आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर गेल्याचे दिसून येत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णवाढ दररोज नवा उच्चांक गाठत आहे. यामध्ये गंभीर, अतिगंभीर रुग्णांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या व्हेटिंलेटर बेडची कमतरता आहे.

  महापालिकेच्या वायसीएम, भोसरी, जिजामाता, अ‍ॅटो क्लस्टर या रुग्णालयांमध्ये गंभीर लक्षणे असणार्‍या रुग्णांवर आणि बालनगरी, घरकुल येथील कोविड केअर सेंटरमध्ये लक्षणेविरहित रुग्णांवर उपचार केले जातात.

महापालिकेची रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यामुळेच नागरिकांना बेड मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. त्यामुळे शहरातील परिस्थिती गंभीर होत चालली असून आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *