Pimpri news: ‘रेमडेसिवीर’ची चढ्या दराने विक्री; बिर्ला, लोकमान्य, डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांना नोटीस
Pckhabar- खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना हॉस्पिटलकडूनच ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची चढ्या दराने विक्री केली जात असल्याची बाब समोर आलीआहे. याप्रकरणी शहरातील तीन नामांकित हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांना महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कारणे दाखवा नोटीस बजाविली असून 48 तासाच्या आत खुलासा मागविला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महामारीतही काही हाॅस्पिटल रूग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक लुट करत आहेत. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल आणि पिंपरीतील डॉ. डी. वाय हॉस्पिटल यांना नोटीस देण्यात आली आहे. कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. या परिस्थितीत ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची मोठी आवश्यकता भासत आहे. त्याचा तुटवडा जाणवत आहे.
या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील 48 तासात अहवाल द्यावा. तसेच साथरोग अधिनियम 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत आपण विरुद्ध आवश्यक कारवाई का, करू नये असे नोटीसमध्ये म्हटले आहे.







Leave a Reply