Pimpri news: लस संपली, लसीकरण थांबले!
Pckhabar-पिंपरी चिंचवड शहरात कोरोना लसीचा साठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर आजपासून लसीकरण थांबले आहे.
शहरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या आणि दुस-या टप्प्यात वैद्यकिय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात आली. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मार्च पासून सुरु झाला आहे. या टप्प्यात ४५ ते ५९ वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्ती (कोमॉर्बिड) आणि ६० वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात येत होती.
तर १ एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील सर्वांना लस दिली जात होती. आजपर्यंत २ लाख २० हजार ८५३ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.
महापालिकेने कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारांबरोबर लसीकरणवरही भर दिला आहे. महापालिकेची ५८ आणि खासगी २९ अशी ८७ लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. झोपडपट्टीतील नागरिकांना लसीकरण केंद्रावर घेवून जावून महापालिका लसीकरण करत आहे. दिवसाला १५ हजारहून अधिक नागरिकांना लस दिली जात होती.
महापालिकेला लसीचा पुरवठा कमी होत आहे. लस संपल्याने लसीकरण थांबवावे लागले आहे.







Leave a Reply