Talegaon News: ५ हजार ४३६ जणांना कोरोना लसीकरण
Pckhabar- तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून १ महिन्यामध्ये ५ हजार ४३६ जणांना कोरोना प्रतिबंधत्मक लसीकरण करण्यात आले आहे.
तळेगाव शहरात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग देखील वाढवण्यात आला आहे. कोरोना नियंत्रित करण्यासाठी शासनाकडून लसीकरण ४ मार्चपासून सुरु झाले आहे. हे लसीकरण तळेगाव केंद्रात आठवड्यामध्ये ३ दिवस केले जात असून दिवसाला ४०० जणांना लसीकरण केले जाते.
तळेगाव केंद्रात लसीकरणाचे नियोजन डॉ. वामन गेंगजे, डॉ. पुनाजी फोले, आरोग्य सहाय्यक दिपक ढवळे, अरुण चोरगे, आशा सोनवणे, सुधाकर चाबुकस्वार, आकाश मस्के, महिमा इडीगिरी यांच्याबरोबर आशा वर्कर असे सुमारे २० ते २५ कर्मचारी लसीकरण मोहिमेत सहभागी आहेत.







Leave a Reply