Pimpri news: पवना धरणातील जलविद्युत निर्मिती केंद्रात बिघाड; शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत
Pckhabar-पवना धरण येथील जलविद्युत निर्मिती केंद्रात बिघाड झाल्यामुळे नदीमध्ये कमी प्रमाणात पाणी सोडले आहे. त्यामुळे रावेत बंधाऱ्याची पातळी कमी झाली आहे. परिणामी, जलउपसा कमी झाल्याने संपूर्ण शहरातील आज बुधवारी आणि उद्या गुरुवारचा सकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहील, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.
मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.
पवना धरण येथील जलविद्युत निर्मिती केंद्रात बिघाड झाल्यामुळे नदीमध्ये कमी प्रमाणात पाणी सोडले आहे. रावेत बंधाऱ्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे जलउपसा कमी झाल्याने संपूर्ण शहरातील आज आणि उद्या सकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहील.










Leave a Reply