Talegaon News: सहायक अभियंता महिलेला शेतकऱ्याकडून 90 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

Talegaon News: सहायक अभियंता महिलेला शेतकऱ्याकडून 90 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले
Pckhabar- शेतीला पवना नदीतून पाणी उपसा करण्याची परवानगी देण्यासाठी शेतकर्‍याकडून जलसिंचन विभागाच्या पवनानगर विभागाच्या सहायक अभियंता महिलेला 90 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले. ही कारवाई तळेगाव दाभाडे परिसरात केली.

लोकसेवक मोनिका रामदास ननावरे (वय-31) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची मौजे कुरूंजगांव येेथे शेती आहे. शेतीला पवना नदीतून पाणी उपसा करण्याची परवानगी देण्यासाठी आरोपी ननावरे यांनी तक्रादार यांच्याकडे 1 लाख 20 हजारांची मागणी केली. तडजोडीअंती 90 हजार रूपये देण्याचे ठरले. आज मंगळवार लाच घेताना ननावरे यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *