Pimpri news: कडक निर्बंधातून वगळण्यासाठी सलून चालकांचे ‘मुंडन आंदोलन’
Pckhabar-राज्यात कोरोना रूग्ण संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारने सलून बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाला विरोध करण्यासाठी व या निर्बंधातून त्वरीत वगळ्याची मागणी करत पिंपरी-चिंचवड नाभिक संघ व महाराष्ट्र नाभिक संघाच्या वतीने सोमवारी मुंडन करून शासनाचा निषेध केला.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नाभिक समाजाने मुंडन आंदोलन केले आहे. मुंडन आंदोलन करून नाभिक समाजाने राज्य सरकार, महानगरपालिका तसेच पोलिस विभागाच निषेध केला.
लॉकडाऊन निर्बंधामध्ये वाईन शॉप सुरू राहतात, हॉटेल पार्सल सेवा सुरू राहते. भाजी दुकाने सुरू राहतात, मात्र सलून-पार्लर पुर्णपणे बंद ठेवली जातात. मग आम्ही जगायचे कसे ? दुकाने बंद राहिली तर खायच काय? असा सवाल नाभिक संघाने विचारला आहे. कोरोना साथ निर्बंधात आम्हाला सलून सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी नाभिक संघाचे शहराध्यक्ष गणेश वाळुंजकर, सचिव समाधान गवळी यांनी केली आहे.










Leave a Reply