Bhosari crime news: पोलिसांना लाथाबुक्यांनी मारहाण, दोघांवर गुन्हा
Pckhabar- पोलीस तपासासाठी दोघांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांना आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी जबर मारहाण करून जखमी केले. सरकारी कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार भोसरीतील गावजत्रा मैदानावर रविवारी घडला.
शाहनवाज नजीर बेग (वय-41), शौकत नजीर बेग (वय-42, दोघेही रा. सुंदर कॉलनी, थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश पंढरीनाथ सावंत यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे सहकारी सुमित देवकर हे आरोपींना तपासासाठी ताब्यात घेण्यासाठी भोसरीतील गावजत्रा मैदानावर गेले होते. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या सहकार्याला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण जखमी केले. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.










Leave a Reply