Pimpri crime news: हॉटेलमध्ये भागीदारी देण्याचे अमिष; व्यावसायिकाला 50 लाखांना गंडविले

Pimpri crime news: हॉटेलमध्ये भागीदारी देण्याचे अमिष; व्यावसायिकाला 50 लाखांना गंडविले
Pckhabar- हॉटेलमध्ये भागीदारी देण्याचे अमिष दाखवून एका दाम्पत्याने व्यावसायिकाला 52 लाखांचा चुना लावला आहे. हा प्रकार हिंजवडी येथे नुकताच उघडकीस आला आहे.
जितेंद्र वेदप्रकाश पुरी ऊर्फ जितराज पुरी ऊर्फ बॉबी पुरी, सुरभी मिश्रा ऊर्फ सुरभी जितेंद्र पुरी ऊर्फ चेतना उदय इलापाते (दोघे रा. फ्लॅट नं. 15/702 लोढा बेलमोंढो, गहुंजे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीकांत विठ्ठलराव गिरी (वय-33, रा. चिखली) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या विश्वास संपादन केला. त्यांना पुणे-बेंगलोर महामार्गावर असलेल्या यारा दि हवेली या हॉटेलमध्ये भागीदारी देण्याचे अमिष दाखविले. यासाठी करारनामा करून वेळोवेळी त्यांच्याकडून रोख 30 लाख रूपये घेतले. तसेच त्यांच्या सासर्‍यांच्या बॅक खात्यावरून 20 लाख 85 हजार रूपये घेत एकूण 50 लाख 85 हजार रूपये घेतले. हॉटेलमध्ये भागीदारी न देता त्यांची फसवणूक केली. फौजदार पवार तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *