Pimpri news: शिवसेना शहरप्रमुखपदी नगरसेवक सचिन भोसले
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुखपदी नगरसेवक ऍड. सचिन भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठवलेल्या पत्रकातून दिली आहे.
माजी शहरप्रमुख योगेश बाबर यांची पिंपरी, चिंचवड, भोसरीच्या जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. तर गजानन चिंचवडे यांची मावळ, चिंचवड, पिंपरीच्या जिल्हाप्रमुखपदी फेरनिवड करण्यात आली आहे.
योगेश बाबर यांची 17 जानेवारी 2018 रोजी शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. मागील तीन वर्षांपासून बाबर यांच्याकडे शिवसेना शहरप्रमुखपद होते. त्यांच्या जागी नगरसेवक सचिन भोसले यांची निवड करण्यात आली आहे. 2017 च्या निवडणुकीत भोसले थेरगावातून महापालिकेवर निवडून आले आहेत. त्यांची पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.










Leave a Reply