Pimpri News: ठेकेदार, नागरिकांना महापालिकेत ‘नो एंट्री’!
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिक, ठेकेदार यांना महापालिकेत ‘नो-एंट्री’ असणार आहे. या प्रवेशबंधीचा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे. नागरिकांनी ई-मेलद्वारे तक्रारी कराव्यात, असेही आयुक्तांनी म्हटले आहे.
शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे महापालिकेतील कर्मचारी संख्या देखील 50 टक्के केली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिका मुख्य प्रशासकीय इमारत, विविध कार्यालये, विभागीय कार्यालयात अभ्यांगत नागरिकांना अत्यावश्यक काम वगळता कार्यालयात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यामधून नगरसेवक, पदाधिका-यांना वगळले आहे. तथापि, बैठकीकरीता निमंत्रित केलेल्या नागरिकांना संबंधित विभाग, कार्यालय प्रमुख यांनी प्रवेश देण्याची व्यवस्था करावी.
अभ्यांगत नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यालयात न येता आपले म्हणने, तक्रारी, सुचना या लेखी स्वरुपात ई-मेलद्वारे विभागास पाठविण्यात याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.










Leave a Reply