Maval news: कवी विठ्ठल दळवी यांना ‘साहित्यरत्न राष्ट्रीय पुरस्कार’ 2021 प्रदान
Pckhabar-समाजाला विचारांतून जागे करण्याचे उत्कृष्ट असे कार्य करणाऱ्या पवन मावळचे कवीभुषण आणि दारूंब्रे येथील पंचक्रोशी हायस्कूलमध्ये कार्यरत असणारे विठ्ठल रामू दळवी यांचा राष्ट्रीय श्रमशक्ती फीनिक्सतर्फे साहित्यरत्न राष्ट्रीय पुरस्कार 2021 प्रदान करून सन्मान करण्यात आला.
दळवी यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने,
झी मराठी- वेध भविष्याचा मधील अतुल शास्त्री भगरे गुरुजी, फॉरेनची पाटलीन या चित्रपटातील अभिनेत्री सुरेखा कुडची,
अभिनेत्री छाया सांगावकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सध्याच्या या कोरोनाच्या महामारीत
सारं जग संकटात असताना, झोपेत असताना ज्यांनी रात्रंदिवस कशाचीही तमा न बाळगता महाराष्ट्राच्या सांप्रदायाची परंपरा महाराष्ट्राची अस्मिता व याच मायभूमीतील थोर संतांच्या विचारांची धुरा हाती घेऊन विचारांतून समाजाला व राष्ट्राला संतांच्या विचारांचा एक प्रभावी मार्ग दाखवत संतांप्रमाणे सेवाभावी व निस्वार्थी वृत्तीने जीवन कसं जगावं, विचारातून समाजाचे हित कसं जाणावं, अखंड विश्वाला आनंद देणारे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या सारखं सत्याचे व धर्माचे रक्षण करून राम राज्य कसे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी धगधगता इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट का करावा, मराठी भाषेचे पावित्र्य कसं जपावं, महाराष्ट्राच्या व्यथा, संतांचे उपकार, शिवरायांची महती, सध्याच्या अदृश्य विषाणूचा पृथ्वीवर शिरकाव, सृष्टी मधील पर्यावरणाचा ऱ्हास कसा थांबवावा व एका विषाणून काय शिकवलं अशा अनेक ज्वलंत प्रश्नांना हात घालून प्रत्येक व्यवस्थेवर सुमारे एक हजार कवितांचे उत्तम लेखन करत ते समाजापुढे मांडत आपला दृष्टीकोण ठेवत समाजाने यातून कसा व कोणता धडा घ्यावा.
भारत देश हा पवित्र व विश्व बंधुत्वाच्या आचार-विचारांचा देश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यातून देश सेवा कशी व पवित्र प्राचीन संस्कृतीची जाणीव करून देत आपले सार्वजनिक हिताच्या विचारांचा मार्ग अवलंबून आपले समाजामध्ये एक वेगळेपण दाखवून एक आदर्श निर्माण केला.
तसेच दळवी यांच्या या सेवाभावी कार्याचा सदैव केलेल्या सुप्त प्रयत्नांचा विविध स्तरांतून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दळवी समाजाला विचारांतून जागे करण्याचे एक चांगले काम करीत आहेत. त्यांची ही देशाविषयीची ही तळमळ पाहून ते गेली ३ वर्षांपासून विचारांचे प्रभावी कार्य पाहून त्यांना अनेक पुरस्कार जाहीर झालेले आहेत.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र लोकसेवा महासंघाने त्यांचा नुकताच लोकसेवा कवीभूषण पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे. कवीभूषण दळवी यांच्या सुप्त गुणांची व देशप्रेमाची सर्वत्र कौतुक होत आहे.
कवीभूषण विठ्ठल दळवी म्हणाले, ”कवितांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत विविध विषयांवर जनजागृती करत आहे”. तसेच येत्या वर्षभरात ५१ पुस्तक प्रकाशनाचा मानस असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.










Leave a Reply