Pimpri Corona news: शहरात कोरोनाचे 1 हजार 485 नवे रूग्ण

Pimpri Corona news: शहरात कोरोनाचे 1 हजार 485 नवे रूग्ण
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. सोमवारी शहरात 1 हजार 472 तर हद्दीबाहेरील 13 असे 1485  नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर एकाच दिवशी 6 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 हजार 315 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात 1 लाख 36 हजार 13 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 17 हजार 492 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 977  तर हद्दीबाहेरील 832 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी 4 हजार 340 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 2 हजार 333 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 2 हजार 965 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 29 घरांना भेटी देऊन 3 हजार 545 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *