Dehu News: देहूच्या वेशीवर वारकर्यांचे ठिय्या आंदोलन
Pckhabar-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) होणार्या श्री संत तुकाराम बीज सोहळ्यासाठी 50 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी जिल्हाधिकार्यांनी दिली आहे. मात्र, वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांनी या निर्णयाला विरोध करत देहूच्या वेशीवर सोमवारी दुपारी भर उन्हात भजन सत्यागृह आणि ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात सुमारे दोनशे वारकरी सहभागी झाले आहेत.
कोरोनाच्या जागतिक महामारीने पुन्हा डोकेवर काढले आहे. देशात सर्वाधिक पुणे जिह्यात कोरोनाचे रूग्ण आहेत. रूग्ण संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले आहेत. कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी प्रशासनाने देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानात केवळ 50 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. मात्र वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे.
देहू येथील तुकाराम बीज कोणत्याही परिस्थितीत वारकरी सांप्रदाय साजरी करणारच, यासाठी आमच्यावर काही गुन्हे दाखल झाले तरी या गुन्ह्यांना सामोरे जायची आमची तयारी आहे, अशी भूमिका बंडातात्या कराडकर यांनी घेतली होती. बीज सोहळ्यानिमित्त वारकर्यांनी देहूत यावे असे आवाहन बंडातात्यांनी केले होते. त्यानुसार सोमवारी देहूच्या वेशीवर महाराष्ट्राच्या काही भागातून वारकरी आले आहेत. या आंदोलनात वारकार्यांकडून कोरोना संदर्भातील सोशल डिस्टसिंग आणि मास्क वापरण्याच्या नियमांचे पालन केले.










Leave a Reply