Mumbai News: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया होणार

 

Mumbai News: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया होणार

Pckhabar-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोटात दुखत असल्याच्या तक्रारीवरून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे.

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पवार काल तपासणीसाठी गेले होते. त्यांना पोटात दुखत असल्याचा त्रास होत होता. तपासणीनंतर त्यांना पित्त मूत्राशयामध्ये त्रास असल्याचे निदान झाले आहे.

त्यामुळे त्यांच्यावर 31 मार्च रोजी छोटी  शस्त्रक्रिया आणि एऩ्डोस्कोपी करण्यात येणार आहे. पुढील सूचना येईपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द असणार आहेत. अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *