Pimpri Corona news: शहरात कोरोनाचे 1 हजार 731 नवे रूग्ण, 1 हजार 243 जणांना डिस्चार्ज
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. शनिवारी शहरात 1 हजार 694 तर हद्दीबाहेरील 37 असे 1731 नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर एकाच दिवशी 4 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 हजार 243 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात 1 लाख 32 हजार 266 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 14 हजार 891 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 961 तर हद्दीबाहेरील 822 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारी 6 हजार 750 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 4 हजार 192 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 1 हजार 949 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 985 घरांना भेटी देऊन 3 हजार 129 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात शनिवारअखेर 1 लाख 22 हजार 50 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.










Leave a Reply