Pimpri Crime news: महापोर्टल परिक्षेसाठी डमी परिक्षार्थी बसवले; एकावर गुन्हा

Pimpri Crime news: महापोर्टल परिक्षेसाठी डमी परिक्षार्थी बसवले; एकावर गुन्हा
Pckhabar- महा पोर्टल परिक्षेसाठी डमी परिक्षार्थी बसवल्याबद्दल एकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2019 मध्ये घेण्यात आलेल्या महा पोर्टल परिक्षेच्या वेळी घडला होता.
याप्रकरणी तहसीलदार माधुरी आंधळे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदिप धनसिंग गोलवाल (रा. हसनबादवाडी, औरंगाबाद) व डमी परिक्षार्थी वर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये महा पोर्टल परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेसाठी आरोपी संदिप गोलवाल याने डमी परिक्षार्थी बसवला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *