Pimpri news: महावितरणच्या कोरोना योद्ध्यांना त्वरित लस देण्याची मागणी

Pimpri news: महावितरणच्या कोरोना योद्ध्यांना त्वरित लस देण्याची मागणी
Pckhabar- राज्यात मार्च 2020 मध्ये कोविड 19 मुळे लॉकडाऊन लावण्यात आला. या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये महावितरणाच्या महसूल प्राप्तीवर विपरित परिणाम झाला. पुणे जिल्ह्यात थकीत वीजबिलासाठी महावितरणाकडून वसुलीचा धडाका सुरू झाला. मार्च अखेरमुळे कर्मचार्‍यांना टार्गेट दिले आहे. आजही पुणे जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. अशा या कोरोनाच्या जीवघेण्या प्रादुर्भावातही महावितरणाच्या महसुलासाठी व जिल्ह्यातील हजारो ग्राहकांना अखंडित वीजपुरवठ्याची सेवा देण्यासाठी महावितरणचे कर्मचारी अविश्रांत काम करत आहेत.

यादृष्टीने महावितरणचे कर्मचारी कोरोना योध्ये ठरले आहेत. मात्र या खर्‍या कोरोना योद्ध्यांना कोविड 19 च्या लसीकरणापासून वंचित ठेवले जात आहे. महावितरणाकडून ही बाब राज्य शासनाच्या लक्षात आणून द्यावी. वसुली व कार्यक्षेत्रातील अभियंता, तंत्रज्ञ व कर्मचारी यांना कोविड 19 चे लसीकरण करण्यास राज्य शासनाकडून मान्यता घ्यावी, अशी मागणी जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य व शिवसेनेचे शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी पुण्याच्या प्रादेशिक संचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्य शासन कोरोनाचा पराभव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या कठीण परिस्थितीमध्ये अभियंता, तंत्रज्ञ, कर्मचारी विजेची उपलब्धता सुनिश्चित ठेवण्याची मोलाची कामगिरी पार पाडत आहेत. नागरिक घरात असताना महावितरणाने 24 तास अखंडित वीजपुरवठा देऊन मोठा दिलासा दिला आहे. हे करत असताना अनेक अधिकारी व कर्मचारी बांधवांना कोरोना विषाणूची लागण झाली. त्यातून ते सहीसलामत बरे होऊन पुन्हा कर्तव्यावर रूजू झाले. या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे काहींना आपले प्राणही गमवावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *