Maharashtra News: सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार

Maharashtra News: सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार
Pckhabar-चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरु कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील 26 लाख 57 हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे अद्यापही 1098 कोटी 64 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 12 लाख 46 हजार 544 ग्राहकांकडे 609 कोटी 57 लाख, कोल्हापूर जिल्ह्यात 4 लाख 86 हजार 827 ग्राहकांकडे 193 कोटी 76 लाख, सांगली जिल्ह्यात 3 लाख 1 हजार 552 ग्राहकांकडे 97 कोटी 52 लाख, सोलापूर जिल्ह्यात 3 लाख 83 हजार 59 ग्राहकांकडे 148 कोटी 42 लाख आणि सातारा जिल्ह्यात 2 लाख 39 हजार 650 ग्राहकांकडे 49 कोटी 36 लाख रुपयांची थकबाकी आहे.

चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करण्यासाठी पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सार्वजनिक सुटीच्या दिवशी शनिवारी (दि. 27) व रविवारी (दि. 28) आणि सोमवारी (दि. 29) कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत. तसेच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट, मोबाईल अॅप किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *