Pimpri news: कायदा बनविणार्‍यापेक्षा कायदा पाळायला शिकविणारे शिक्षक महत्त्वाचे : आयुक्त कृष्ण प्रकाश

Pimpri news: कायदा बनविणार्‍यापेक्षा कायदा पाळायला शिकविणारे शिक्षक महत्त्वाचे : आयुक्त कृष्ण प्रकाश
Pckhabar- लोकप्रतिनिधींद्वारे कायदे संमत करून त्याची पोलिसांमार्फत अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेमध्ये हे दोन महत्वाचे घटक आहेत. परंतु कायदा पाळला पाहिजेत हे शिकविणारे शिक्षक हे अधिक महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले.

आकुर्डी येथील डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाच्या वतीने आयोजित केलेल्या परिसंवादात राष्ट्रनिर्मितीमध्ये शिक्षकांची भूमिका या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डीवायपाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक कर्नल( नि) एस के जोशी यांनी आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा सत्कार केला.

आयुक्त कृष्ण प्रकाश पुढे म्हणाले कि, सध्या गुन्हेगारीमध्ये तरुणांचे  वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी केवळ शिक्षा देणे पुरेसे नाही. तर शिक्षकांनी अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना कायद्याचे महत्व व संविधानाचे पावित्र्य समजावून सांगितले पाहिजेत.जीवन जगण्याचे देखील शिक्षण दिले पाहिजेत. तरुणांचा देश म्हणून जगात भारताची  ख्याती आहे. तरुणांनी आपल्या कार्यशैलीने आलेल्या संधीचे सोने करावे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शलाका पारकर यांनी तर आभार प्रा जस्मिता कौर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.निरज व्यवहारे, डॉ. के.निर्मला, प्रा अरविंद कोंडेकर, डॉ. अनुपमा पाटील, रश्मी श्रीवास्तव, डॉ. विजय वढाई यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *