Pimpri news: राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होण्यासाठी कार्यकर्त्यांचे राज्यव्यापी ’महा स्वाक्षरी’अभियान

Pimpri news: राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होण्यासाठी कार्यकर्त्यांचे राज्यव्यापी ’महा स्वाक्षरी’अभियान
Pckhabar- सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या मोदी सरकारला घालवून धर्मनिरपेक्ष काँग्रेस सरकार देशात आणण्यासाठी राहुल गांधीनी  तातडीने काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे असा  आग्रह धरण्यासाठी  काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या राज्यव्यापी  ’महा स्वाक्षरी अभियान’ ची सुरवात गांधी भवन मुंबई येथून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची स्वाक्षरी घेऊन करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे  माजी अध्यक्ष अशोक मोरे आणि त्यांचे सहकारी अनिकेत कोठावळे, अशोक मंगल, आयुष मंगल, उमेश काळे, नरेंद्र बनसोडे, हिराचंद जाधव व इतर कार्यकर्त्यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत या राज्यव्यापी महा स्वाक्षरी अभियानाची घोषणा केली होती, त्याची सुरवात गांधी भवन मुंबई येथे काँग्रेस पदाधीकार्‍यासमवेत करण्यात आली.
’महास्वाक्षरी अभियान ’ हे पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यात होईल. प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्ते, हितचिंतक आणि नागरिकांच्या स्वाक्षर्‍या घेतल्या जातील. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीदरम्यान सर्व स्वाक्षर्‍या सादर केल्या जातील, असेही अशोक मोरे यांनी सांगितले.

आम्ही काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आजपासून या मोहिमेला सुरुवात करत आहोत. यावेळी काँग्रेस नेते नसीम खान आमदार अतुल लोंढे, कुनाल पाटील, अमित झनक वयात मिर्झा असे अनेक आमदार व हर्षद पुरोहित, हरि नब्बीयार तुषार वाघमारे अजित शिशुपाल, गणेश साळवी आदी  पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश सोनवणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सरचिटणीस उमेश काळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *