Talegaon News: कोरोना नियमावलीचा भंग; नगराध्यक्षासह पदाधिकार्‍यांवर दंडात्मक कारवाई

Talegaon News: कोरोना नियमावलीचा भंग; नगराध्यक्षासह पदाधिकार्‍यांवर दंडात्मक कारवाई
Pckhabar- कोरोना नियमावलीचा भंग केल्याबद्दल तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षा, भाजपचे शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्या सह  नगरसेवकांवर नगरपरिषदेच्या प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे.

तळेगाव शहर हे कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट होत असल्याने नगर परिषद प्रशासनाकडून कोरोना बाबतच्या नियमावलीची कठोर अंमलबजावणी चालू आहे. त्यामध्ये मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे, सँनीटायझरचा वेळोवेळी वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे आदि बाबतची जनजागृती व सूचना नगर परिषदेच्या प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. मात्र काहीजण या नियमकडे कानाडोळा करत असल्याने त्यांच्यावर नगर परिषद प्रशासन दंडात्मक कारवाई करत आहे.

तळेगाव दाभाडे नगर परिषदे मध्ये नुकतीच स्वीकृत सदस्य पदाची निवडणूक झाली. त्यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी मास्क न लावण्याच्या कारणामुळे नगर परिषद प्रशासनाने नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, गटनेते अमोल शेटे, नगरसेविका कल्पना भोपळे, सुरेश दाभाडे, अरुण भेगडे, शहराध्यक्ष रवींद्र माने, गणेश भेगडे यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्याने प्रत्येकी 500 रुपयाची दंडात्मक कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *