Bhosari news: महावितरणचा गलथान कारभार, उघड्या डीचा धक्का लागून 12 वर्षाचा मुलगा भाजला

Bhosari news: महावितरणचा गलथान कारभार, उघड्या डीचा धक्का लागून 12 वर्षाचा मुलगा भाजला
Pckhabar- भोसरी परिसरात महावितरणच्या उघड्या डीपीचा धक्का लागून 12 वर्षाचा मुलगा गंभीर भाजला आहे. महाविरणच्या गलथान कारभाराविरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

प्रेम चौगुले असे गंभीर भाजलेल्या मुलाचे नाव आहे. महावितरणच्या उघड्या डीपी जवळ खेळत असताना, त्याला विजेचा जोरदार धक्का लागला. महावितरणच्या गलथान कारभारामुळे प्रेम 40 टक्के भाजला गेलाय. महावितरणने  डीपी जवळ धोक्याच चिन्ह लावणं तसेच डीपीला तारेच कुंपण करणे गरजेचे होतं. मात्र महावितरणने डीपी सभोवताली तारेच कुंपण न केल्याने प्रेम सारखा निष्पाप मुलगा भाजला गेला आहे. महावितरणच्या कर्मचार्‍यावर  गुन्हा  दाखल करण्यात यावा अशी मागणी प्रेमच्या पालकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *