Pimpri news: सार्वजनिक ठिकाणी होळी, धूलिवंदन साजरे केल्यास कारवाई

Pimpri news: सार्वजनिक ठिकाणी होळी, धूलिवंदन साजरे केल्यास कारवाई

Pckhabar-मोकळ्या जागा अगर रस्त्यावर होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमीचा उत्सव साजरा करण्यास मनाई करण्याबाबतचा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी जारी केला आहे.

महानगरपालिकेच्या उद्याने, मैदाने, शाळा आणि मालकीच्या जागी तसेच सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारे होळी व धुलीवंदन तसेच कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे.  होळी व धुलीवंदन सण सार्वजनिक स्वरुपात साजरी करावयाचा नसल्याने या काळात कोणत्याही प्रकारचे सामुदायिक, सांस्कृतिक, सार्वजनिक अशा सामाजिक एकत्रीकरण कार्यक्रमांना परवानगी राहणार नाही.  कोविड विषयक घ्यावयाची महत्वाची खबरदारी, संबंधित नियम याबाबत देखील महानगरपालिका सहाय्यक आयुक्त तसेच क्षेत्रिय अधिका-यांनी आपल्या कार्यक्षेत्रात  सातत्याने जनजागृती करावी अशा सूचना आयुक्त पाटील यांनी संबंधितांना दिल्या आहेत.  मास्क सुयोग्य प्रकारे परिधान न करणे, रस्त्यावर थुंकणे, विना परवानगी कार्यक्रम आयोजित करणे, गर्दी करणा-यांवर महानगरपालिका सहाय्यक आयुक्त, क्षेत्रिय अधिकारी, पोलीस प्रशासन यांनी नियमितपणे दंडात्मक कारवाई करावी असे देखील आयुक्त पाटील यांनी स्पष्ट केले आहे.  ८ क्षेत्रिय अधिकारी पथके, ८ भरारी पथके तसचे ८ अंमलबजावणी पथके यांनी कडक कारवाई करावी असे आदेश देखील आयुक्त  पाटील यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहेत.

 कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकार, राज्य शासन आणि महापालिकेद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील.  सदर आदेश दि. २४ मार्च २०२१ पासून पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *