Pimpri news: नोकरीच्या मानसिकतेतून, व्यवसायाची मानसिकता..!
Pckhabar- तरुणांमध्ये नोकरीची मानसिक कमी होऊन एक चांगला उद्योजक होण्याची मानसिकता वाढीस लागवी, या उद्देशाने लायन्स क्लब्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 च्या कौशल्य विकास प्रकल्पा अंतर्गत लायन्स क्लब ऑफ पूना निगडी,पुणे आकुर्डी, पुणे 21 st सेन्चुरी,पुणे फिनिक्स व प्रेरणा कौशल्य विकास यांच्या संयुक्त विद्यमाने “Young India Mission” साकारण्यासाठी विद्यार्थी, नवउद्योजक, शिक्षक, पालक यांना मार्गदर्शन करण्यात आले, अशी माहिती प्रेरणा कौशल्य विकास संस्थेच्या संस्थापिका लायन उषा येवले, DC Skill डेव्हलोपमेंट एम जे एफ लायन अशोक येवले यांनी दिली.
“नोकरीच्या मानसिकतेतून व्यवसायाची मानसिकता वाढीस लागावी म्हणून “व्यवसाय मार्गदर्शन ” यावर गेल्या आठ महिन्यात विविध तज्ज्ञांनी चर्चासत्राद्वारे कॉलेज विद्यार्थी, नवउद्योजक, शिक्षक,पालक यांना मार्गदर्शन केले आहे व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
आय टी आय..भविष्यातील संधी या विषयावर भारतीय टेक्निकल इंस्टीट्युटचे डायरेक्टर श्री नंदकिशोर जगदाळे यांनी आय टी आय स्थापनेचे महत्व, विविध कोर्सेस, त्यातील विषय, ६ महिने ते ३ वर्ष मुदतीचे कोर्स, फी आकारणी, फी परताव्याची सरकारी योजना, व्यवसाय व भविष्यातील उच्च शिक्षणाची संधी यावर सविस्तर विवेचन केले.
“व्यवसायाची क्षितिजे ” या विषयावर यशस्वी उद्योजक व माजी प्रांतपाल एम जे एफ लायन ओमप्रकाश पेठे यांनी व्यवसायाची निवड, मार्केटचा अभ्यास, technology upgradation, नीतिमत्ता,चोख ताळेबंद,कामगारांचा सहभाग, delegation, कौटुंबिक पाठबळ यावर समर्पक चर्चा केली.
” शासन आपल्यादारी..उद्योजकता घरोघरी ” या विषयावर श्री सदाशिव सुरवसे, सहसंचालक उद्योग पुणे, महाराष्ट्र शासन यांनी शासकीय योजना, आर्थिक व technology चे पाठबळ,महिलांना प्राधान्य, subsidy, मार्केट support, यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या ऑफिसमध्ये मार्गदर्शनासाठी इच्छुकांना ते प्राधान्य देत आहेत.
” Measurement Units ” या चार्टचे अनावरण व वितरण मराठा चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्रीज व agriculture चे vice प्रेसिडेंट श्री. दीपक करंदीकर यांचे हस्ते MIDC तील 25 कंपन्यांना करण्यात आले. यामुळे लायन्स कार्याची महती घरोघर पोहचली आहे.
” Business Accountancy ” यावर C.A. लायन विष्णूदास बांगड यांनी सखोल माहिती सांगितली.
1. Basics of account
2. How to prepare vouchers of expenses.
3. How to prepare bill
4. How to keep financial records.
5. Preliminary knowledge of direct & indirect taxes.
वरील विषयांवर लायन बांगड यांनी चर्चा केली व व्यवसायात काही अडचणी असतील तर मार्गदर्शनाची तयारी दाखविली.
“व्यवसायाला साथ – बँकेचा हात ” यावर श्री देव कुमार,वरिष्ठ अधिकारी SIDBI यांनी खालील विषयांवर मार्गदर्शन केले.
1. How to approach Banks / Finincial Institutes for finance
2. How to get prepared before approaching Banks for credit
3. Various schemes being offered by SIDBI for promotion and Development of Enterprises.
4. Various credit schemes being offered by SIDBI.
“व्यावसायिक यशाची त्रिसूत्री “Customer need,Financial Viability, Technical Feasibility ही त्रिसूत्री वापरून व्यवसायात यशस्वी कसे व्हावे हे श्री जयदीप देसाई यांनी समर्पकपणे उदाहरणासहित विश्लेषण केले.
“QMS..स्व प्रगती व्यवसायाला गती.” श्री राजीव शिर्के यांनी QMS चे प्रकार, त्यासाठीचे नियोजन, कार्यक्षमतेत व गुणवत्तेत वाढ, वैयक्तिक प्रगती या विषयी सखोल चर्चा केली.
भाऊसाहेब हिरे विद्यालय, पर्वती पायथा, पुणे या शाळेतील शिक्षक बंधू आणि भगिनी यांना प्रेरणा कौशल्य विकासच्या माध्यमातून लायन्स क्लब्स इंटरनॅशनल राबवित असलेल्या उपक्रमांचे सादरीकरण एम जे एफ लायन अशोक येवले यांनी केले.
कोविड आटोक्यात आल्यानंतर मे २०२१ मध्ये एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या महापौर माई ढोरे, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना प्रेरणा कौशल्य विकासच्या माध्यमातून लायन्स क्लब्स इंटरनॅशनल राबवित असलेल्या उपक्रमांचे सादरीकरण एम जे एफ लायन अशोक येवले यांनी केले.
कौशल्य विकास,महिला सबलीकरण व रोजगाराच्या संधी यासाठी PCMC व लायन्स क्लब्स इंटरनॅशनल संयुक्तपणे उपक्रम राबविणार आहेत.
कोविड आटोक्यात आल्यानंतर मेणाचे शिल्पकार श्री भाटिया, महाबळेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली जागृती अंध मुलींची शाळा, देवाची आळंदी येथे मेणापासून विविध कलाकृती बनविण्याचे प्रशिक्षण शिबीर भरविण्यात येणार आहे. त्यासाठी लायन येवले परिवाराकडून रुपये अकरा हजाराची देणगी देण्यात आली.
याबाबत प्रेरणा कौशल्य विकास संस्थेच्या संस्थापिका लायन उषा येवले, DC Skill डेव्हलोपमेंट एम जे एफ लायन अशोक येवले म्हणाले ” वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमामुळे नवयुवकांच्या मानसिकतेत नक्कीच बदल घडून येईल अशी खात्री वाटते. ”
तसेच आजपर्यंत १५०० उत्साही तरुणांनी प्रत्यक्ष चर्चेत सहभाग घेऊन अथवा recorded माहितीच्या आधारे ज्ञानार्जन केल्याचेही येवले दाम्पत्याने सांगितले.










Leave a Reply