Pimpri news: सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. लक्ष्मण गोफणे

Pimpri news: सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. लक्ष्मण गोफणे
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी बढती देण्यात आली आहे. त्यांची आस्थापना आरोग्य विभागात असणार आहे.

ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी बढती देण्यास 5 मार्च 2021 रोजी झालेल्या पदोन्नती समिती बैठकीत मान्यता दिली. तर, 20 जानेवारी 2021 च्या सर्वसाधारण सभेने डॉ. गोफणे यांनी पदोन्नती देण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार डॉ. गोफणे यांना सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी बढती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिले आहेत.

डॉ. गोफणे यांनी कोरोना काळात चांगले काम केले. स्वतःहून जबाबदारी घेतली. त्यांनी आरोग्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले. त्यांच्याकडे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदाचा पदभार देण्यात आला होता. आता त्या पदावर त्यांना बढती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *