Dehu News: देहुत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास वारकरी संप्रदायाने सहकार्य करावे: आयुक्त कृष्ण प्रकाश
Pckhabar- संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यास वारकरी संप्रदायातील पाईकांसह भाविकांनी कोरोना सर्वत्र झपाट्याने वाढत असल्याने देहुत गर्दी न करता, आपआपल्या भागात बीज सोहळा मोजक्याच वारकर्यांत साजरा करून कोरोना देहुत गर्दी करून आपल्यामुळे वाढणार नाही याची दक्षता घेवून पोलिस व आरोग्य सेवा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केली.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त प्रकाश यांनी तीर्थक्षेत्र आळंदीतील वारकरी संप्रदायातील विविध वारकरी संस्थांचे पदाधिकारी, महाराज मंडळी व संप्रदायातील क्रियाशील मान्यवर यांचे समवेत कोरोना महामारीचे संकट काळात तीर्थक्षेत्र देहुत (दि.30) बीज सोहळा होत आहे. या पार्श्वभुमीवर देहुत मोजक्याच वारकरी भाविकांत बीज सोहळा होण्यासह देहुत गर्दी होवू नये म्हणून वारकरी व पोलिस प्रशासन यांचे समवेत सुसंवाद बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
या बैठकीस पोलिस अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त मंचक इप्पर, आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलिस हवालदार मच्छिंद्र शेंडे, ह.भ.प. बाळासाहेब महाराज शेवाळे, आत्माराम महाराज शास्त्री, पांडुरंग महाराज शितोळे, पंडित महाराज क्षीरसागर,कल्याण महाराज गायकवाड, नरहरी महाराज चौधरी, राजाभाऊ रंधवे चोपदार, भगवान साकरे, लक्ष्मण पाटील, संग्रामबापू भंडारे, नगरसेवक प्रकाश कुर्हाडे, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, माजी शिवसेनेचे खेड तालुका प्रमुख उत्तम गोगावले, अविनाश महाराज धनवे आदि महाराज उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे म्हणाले, देहु देवस्थान मध्ये 50 मान्यवर वारकरी लोकांत बीज सोहळा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेले वर्षभर सर्व सण, उत्सव, वारी देखील मोजक्या लोकांत साजरी करण्यात आली आहे. महाराष्टात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहे शासनाची भुमिका लोकांना मदत करण्याची आहे. शासनाच्या नियमांचे पालन काळजी घेउन करणे गरजेचे आहे. सर्वांवर बधने आहेत. सर्वांचे सुरक्षिततेसाठी हे नियोजन असून कोणीही सुरक्षिततेच्या बाबतीत आडमुठी भुमिका घेऊ नये तसेच शासनाचे नियम सर्वानी पाळावे. सोशल मिडीयावर अथवा इतर ठिकाणी वेगळे वर्तन घडु नये. कायदा सुव्यवस्था कायम राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपस्थित वारकरी महाराज मंडळी यांचेतील मान्यवरांनी संवाद साधत वारकरी संप्रदायावर धार्मिक कार्यक्रमांची बंधने शिथिल करून धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन, भजन, सप्ताह 50 ते 100 वारकरी भाविकांच्या उपस्थितीत सुरू करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली. संग्रामबापू भंडारे यांनी सूत्रसंचालन केले. वरिष्ठ पोलिस निरीशक ज्ञानेश्वर साबळे यांनी प्रास्ताविक केले. धनवे महाराज यांनी आभार मानले. पसायदान गायनाने पोलिस व वारकरी संप्रदायातील मान्यवरांच्या संवाद बैठकीची सांगता झाली.







Leave a Reply