Pimpri Corona news : कोरोनाचा कहर, शहरात 1 हजार 558 नवे रूग्ण

Pimpri Corona news : कोरोनाचा कहर, शहरात 1 हजार 558 नवे रूग्ण
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. मंगळवारी शहरात 1 हजार 519 तर हद्दीबाहेरील 39 असे 1558  नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर एकाच दिवशी 13 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 812 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात 1 लाख 25 हजार 71 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 11 हजार 216 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 933  तर हद्दीबाहेरील 810 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी 4 हजार 889 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 4 हजार 490 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 990 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.

1 हजार 457 घरांना भेटी देऊन 4 हजार 870 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.  शहरात मंगळवारअखेर 1 लाख 23 हजार 21 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *