Pimpri news: उपमहापौरपदी हिराबाई घुले यांची बिनविरोध निवड
Pckhabar-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी हिराबाई घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे.
उपमहापौरपदाच्या निवडीसाठी मंगळवारी महापालिकेची विशेष सभा मुख्य प्रशासकीय इमारतीमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. निवडणूकीच्यावेळी आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, प्रभारी कायदा सल्लागार, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर उपस्थित होते.
नगरसचिव, प्रभारी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी सभेचे प्रशासकीय कामकाज पाहिले. राष्ट्रवादी काॅग्रेसने उपमहापाैर पदासाठी पंकज भालेकर यांचा अर्ज दाखल केले होता. परंतू, पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी भालेकर यांचा अर्ज माघारी घेतला. त्यामुळे उपमहापौर नानी उर्फ हिराबाई गोवर्धन घुले यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचे महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयुक्त राजेश पाटील, पिठासीन प्राधिकारी रुबल अग्रवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.










Leave a Reply